स्टारलाइनची कुपी पृथ्वीच्या दिशेने   

अंतराळ स्थानकात सुनीता विल्यमचा मुकाम वाढला

ह्यूस्टन : आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात नासाचे दोन अवकाशवीर सुनिता विल्यम आणि बुच विल्मर यांना मागे सोडून बोइंग कंपनीच्या स्टारलाइन कुपीने पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. शनिवारी मध्यरात्री ती मेसिकोच्या वाळवंटात उतरण्याची शयता आहे.स्टारलाइन कुपीने पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे भारतीय वंशाची नासाची अवकाशवीर सुनीता विल्यम आणि बुच विल्मर यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पुढील वर्षापर्यंत मुकाम राहणार आहे. सध्या कुपी अंतराळ स्थानकापासून सुमारे ४२० किलोमीटरवर चीनच्या आकाशात आहे. ती सहा तासांत ती मेसिकोच्या वाळवंटात मध्यरात्री  पोहोचेल. सुनीता विल्यमने कुपीच्या प्रवासावर भाष्य करताना सांगितले की, ती (कुपी) आता आपल्या घराकडे (पृथ्वी) रवाना झाली आहे. याच कुपीतून विल्यम आणि विल्मर जूनमध्ये पृथ्वीवर परतणार होते. पण, तांत्रिक बिघाडामुळे दोघांचा पुढील प्रवास रखडला होता. त्यांच्या परतीचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे त्यांचा मुकाम अंतरराळ स्थानकात आता वाढला  आहे. नासाने  कोणताही जोखीम घेणे आता टाळले आहे. स्टारलाइन कुपी दोघांच्या रिकाम्या आसनासह, अंतराळ पोषाख आणि अन्य जुन्या साहित्यांसह पृथ्वीच्या दिशने मार्गक्रमण करू लागली आहे. स्पेस एसने दोघांना अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर आणण्यासाठी गेल्या फेब्रुवारीत मोहीम राबवली होती. आठ दिवसांचा प्रवास होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे तो आठ महिन्यांपेक्षा अधिक लांबला आहे. कुपीच्या माध्यमातून अंतराळ स्थानक ते पृथ्वी असा खास प्रवास करण्याचे आणि अवकाशवीरांना त्या माध्यमातून सहज ये-जा करता यावी, हे स्वप्न तूर्त तरी भंगले आहे. बोइंग कंपनीने त्यासाठी दोनदा चाचणी घेतली होती. प्रथम २०१९ मध्ये मानवरहित चाचणी घेतली. त्यात अडचणी आल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यासाठी १ अब्ज डॉलर्सचा खर्च झाला होता.

आता ड्रॅगन कुपीवर लक्ष

स्पेस एस कंपनी पुन्हा ड्रॅगन कुपी अंतराळ स्थानकाकडे पाठविणार आहे. २०२० नंतरची नासाची ही दहावी मोहीम असणार आहे. कुपीत फत दोन अवकाशवीरांना प्रवास करता येतो. त्या विल्यम आणि विल्मर यांच्यासाठी राखीव असतील. 

Related Articles